pratap sarnaik and kirit somayya

विहंग गार्डन्स(vihang gardens) ही इमारत कोणत्याही प्रकारे अनधिकृत(illegal building) नसून कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे माझी खोटी बदनामी केल्याप्रकरणी, किरीट सोमय्या यांच्या विरोधात मी कोर्टात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

ठाणे : विहंग गार्डन्स(vihang gardens) ही इमारत कोणत्याही प्रकारे अनधिकृत(illegal building) नसून कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे माझी खोटी बदनामी केल्याप्रकरणी, किरीट सोमय्या यांच्या विरोधात मी कोर्टात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे प्रताप सरनाईक(pratap sarnaik) म्हणाले. तसेच कधी पाकिस्तानी कार्ड आणि इतर लोकांचे संबंध माझ्याशी जोडायचे तर कधी तानाजी मालुसरे यांची तुलना करून मला गोत्यात टाकण्याचे काम भाजपकडून होत आहे.मी शेवटपर्यंत ईडीच्या चौकशीला सामोरे जाईल असे देखील सरनाईक यांनी सांगितले आहे.

आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते, सरनाईक यांनी बांधलेली विहंग गार्डन या बिल्डिंगला ओसी प्राप्त नसून, ती अनधिकृत असल्याने महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते, त्यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले आहे.


दरम्यान प्रताप सरनाईक यांनी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मला समजले असून सरनाईकांच्या या नोटीसचे मी स्वागत करतो अशा प्रकारचे ट्विट भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.