पालघर जिल्ह्यात बरसरल्या मान्सून पूर्व पावसाच्या सरी

पालघर : पालघर जिल्ह्यतल्या बऱ्याच भागांत आज सकाळी मान्सून पूर्व भागात पावसाच्या सरी बरसल्या. तर सध्या सर्वत्र पावसाचं वातावरण कायम आहे. आज सकाळी जवळपास ४.३० वाजताच्या दरम्यान बोईसर , धनानीनगर

 पालघर : पालघर जिल्ह्यतल्या बऱ्याच भागांत आज सकाळी मान्सून पूर्व भागात पावसाच्या सरी बरसल्या. तर सध्या सर्वत्र पावसाचं वातावरण कायम आहे. आज सकाळी जवळपास ४.३० वाजताच्या दरम्यान बोईसर , धनानीनगर भागांत ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटा सह काही काळ पावसाच्या सरी बरसरल्या. तर पालघर भागांत सकाळी जवळपास 4 वाजताच्या दरम्यान काही काळ पावसाच्या सरी बरसरल्या.

मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. मुंबईतील चेंबूर, कुर्ला, सायन, अंधेरी, दादर या परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची सकाळ काहीशी दिलासादायक झाली.

दरवर्षी महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मान्सून पूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.