ऐच्छिक स्वरुपात खाजगी कोरोना तपासणीसाठी क्रन्सातर्फे दरामध्ये सवलत –  गौरीपाड्यात लवकरच कोरोना लॅब सुरु होणार

कल्याण : कोरोना साथीच्‍या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील नागरिकांना अल्‍प दरात वैदयकिय सेवा देण्‍याकरीता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातुन डोंबिवली येथील शास्‍त्रीनगर

  कल्याण : कोरोना साथीच्‍या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील नागरिकांना अल्‍प दरात वैदयकिय सेवा देण्‍याकरीता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातुन डोंबिवली येथील शास्‍त्रीनगर रूग्‍णालयात सिटी स्‍कॅन, एमआरआय, सोनोग्राफी आणि पॅथॉलॉजिची सेवा क्रन्सा डायग्‍नॉस्टीकच्‍या माध्यमातून उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली आहे.  त्‍याचप्रमाणे खासदार  श्रीकांत शिंदे यांनी महापालिकेच्‍या रूग्‍णालयासाठी १० व्‍हेटिलेंटरदेखील उपलब्‍ध करून दिले आहेत. सदयस्थितीत खाजगी लॅबचे कोव्हिड तपासणीचे दर रू ४५०० असताना ज्‍या नागरिकांना ऐच्छिक स्वरुपात खाजगी, कोव्हिड तपासणी करावयाची आहे, त्यांना क्रन्सा डायग्‍नॉस्टीक यांनी रू ३००० इतक्‍या माफक दरात कोव्हिड तपासणचो सोय उपलब्ध करून दिली आहे, तसेच महापालिकेमार्फत कोव्हिडची तपासणी मोफत करून देण्‍यात येते, अशा रूग्‍णांना स्‍वॅब देण्‍यासाठी फिरावे  लागू नये, यासाठी क्रन्‍सामार्फतच सदर रूग्‍णांचे स्‍वॅब कलेक्शनचे काम केले जाते,

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्‍पनेतून कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका परीसरातील व आजुबाजूचे क्षेत्रातील रूग्‍णांना तातडीने कोव्हिड तपासण्‍याची सोय उपलब्‍ध करण्‍याकरीता मौजे गौरीपाडा येथे पी.पी.पी. तत्वावर लवकरच कोव्हिड लॅब सुरू होत असून त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली असून तेथील कर्मचारी वर्ग व इतर इन्व्हेस्टमेंट संबंधित लॅब ची असणार आहे. त्‍यामुळे रूग्‍णांना त्‍यांचा कोव्हिड तपासणीचा अहवाल तातडीने मिळू शकेल, अशी माहिती महापौर विनिता राणे व पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली.