खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखाच्या विम्याच कवच द्यावे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कोरोना (Corona Virus) काळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांनाही (Private Doctor) ५० लाख रुपयांचे विमा (Insurance) कवच देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारनेही हा निर्णय घेऊन कोरोनाशी सापना करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना ५० लाख रुपये विम्याचे कवच द्यावे अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी (MP Dr. Shrikant Shinde) आज केंद्रीय संसदीय अधिवेशनात केली आहे.

डोंबिवली : कोरोना (Corona Virus) काळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांनाही (Private Doctor) ५० लाख रुपयांचे विमा (Insurance) कवच देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारनेही हा निर्णय घेऊन कोरोनाशी सापना करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना ५० लाख रुपये विम्याचे कवच द्यावे अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी (MP Dr. Shrikant Shinde) आज केंद्रीय संसदीय अधिवेशनात केली आहे. संसदीय अधिवेशनात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Health Minister Harsh Vardhan)  यांच्याकडे ही मागणी केली आहे. परप्रांतीय मजूर हे सगळ्य़ात जास्त कल्याण लोकसभा मतदार संघात आहेत. ज्या मतदार संघाचा मी खासदार आहे. ज्या मतदार संघाचे मी नेतृत्व करतो.

कोरोना काळात सर्व पक्षांनी एकत्रित येऊन कोरोनाची लढाई लढली पाहिजे. असे आवाहन खासदार शिंदे यांनी संसदेत केले आहे. संसर्गजन्य कोरोनाचा सामना करण्यासाठी माझ्या मतदार संघात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने जंबो कोविड सेंटर, रुग्णालये उभारली आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. उपचाराची सुविधा झाली आहे. रुग्ण बरे होत आहेत. मतदार संघात ऍन्टीजेन कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवित असताना आरटीपीसीआर चाचण्याही वाढविल्या. सुरुवातीला तापाच्या दवाखाने उघडले. ताप आल्यावर अनेक रुग्ण हे दवखान्यात येत नव्हते. त्याचे कारण ताप आला असे सांगितल्यावर क्वारंटाईन व्हावे लागेल. चाचणी करावी लागेल.

कोरोनाची टेस्ट पॉझीटीव्ह आली तर कुटुंबाचे काय होईल अशी भिती होती. सुरुवातीला तापाचे दवाखाने सुरु केले. त्यामुळे रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करता आला. कोरानावर औषध सापडले नाही. लसही तयार झालेली नाही. मात्र कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यात रेमीडेसीवीर हे इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याने मतदार संघातील महापालिकांच्या माध्यमातून रेमीडेसीवीर हे इंजेक्शन खरेदी करुन ते महापालिका रुग्णालयातून मोफत दिले जात आहे. त्यामुळे मतदार संघातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा नियंत्रणात व कमी ठेवणे शक्य झाले आहे. पण सिटी स्कॅनची सुविधा अनेक रुग्णालयात नाही. जास्तीत जास्त रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सरकारने विचार करवा.