कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना मिळणार मानधन –  माजी आमदार नरेंद्र पवारांच्या मागणीला यश

कल्याण : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सुरुवातीपासूनच वैद्यकीय सेवा देणारे योद्धे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. यामध्ये कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेने वैद्यकीय संघटना व राज्य पातळीवर

 कल्याण : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सुरुवातीपासूनच वैद्यकीय सेवा देणारे योद्धे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. यामध्ये कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने वैद्यकीय संघटना व राज्य पातळीवर संपर्क साधून महानगरपालिका क्षेत्रातील खासगी डॉक्टरांना एकत्रित करून महानगरपालिकेची ताप, सर्दी, खोखल्यासाठी सुरू असलेली उपचार केंद्रे खासगी डॉक्टरांच्या मदतीने चांगल्या पद्धतीने कार्यरत ठेवली आहेत. डॉक्टरांचा समूह सतत सक्रियपणे प्रयत्नशील राहून कोरोना मुक्तीसाठी काम करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते डॉक्टर सांभाळत असलेल्या सामान्य उपचार केंद्रांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण राहिली आहे. मात्र त्यांना मानधन दिले जात नव्हते. त्यामुळे डॉक्टर संघटना व डॉक्टर योद्धे यांनी नरेंद्र पवार यांच्याकडे आपली व्यथा मांडल्यानंतर त्यांना मानधन मिळाले पाहिजे. यासाठी माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्या मागणीला यश आले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या संदर्भात निर्णय घेतला असून खासगी डॉक्टरांना मानधन दिले जाणार आहे.

खासगी डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत एकत्रितपणे सेवा देण्याचे काम कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून चालू ठेवले आहे. आता त्यांना आर्थिक मानधन मिळाल्याने कोरोना विषाणू मुक्तीसाठी चांगली सेवा देता येणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल कडोंमपाचे आभार मानत काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी आशा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.