लालबावटा रिक्षा चालक मालक युनियनतर्फे रिक्षा चालकांचे उद्या आंदोलन

डोंबिवली : तीन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. रिक्षा चालकांचे लॉकडाऊनमुळे नुकसान झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनशुन्य लॉकडाऊनमुळे जसा कामगार, कष्टकरी

 डोंबिवली : तीन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. रिक्षा चालकांचे लॉकडाऊनमुळे नुकसान झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनशुन्य लॉकडाऊनमुळे जसा कामगार, कष्टकरी वर्ग भरडला आहे तसा रोज कमवून खाणाऱ्या रिक्षा चालकांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे व कुटुंबाला जगवणे मुश्कील झाले आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लालबावटा रिक्षा युनियनने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

हे आंदोलन ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता लॉकडाऊन नियमांचे पालन करून रिक्षाचालक आपआपल्या घरासमोर हातात झेंडे घेऊन करणार आहेत. प्रत्येक रिक्षा चालकाला दहा हजार रुपयांची रोख मदत द्यावी. रिक्षा कर्जाच्या हप्त्यात मार्च,एप्रिल, मे, जून या चार महिन्याची सवलत द्यावी. रिक्षा कर्जावरील व्याज मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्याचा माफ करावा. रिक्षा चालकांना तीन महिन्यांकरीता मोफत धान्य पुरवठा करावा अशा अनेक मागण्यांचे फलक घेऊन निदर्शने करणार आहेत, अशी माहिती लालबावटा रिक्षा चालक मालक युनियन, डोंबिवलीचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी दिली.