maxist communist party
भिवंडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने 

भिवंडी कमिटीच्या वतीने जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांचा कडकडीत निषेध करण्यात आला.

भिवंडी : केंद्र सरकारने (Central Government) दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून, माकप ( Marxist Communist Party)चे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी व इतर चार बुद्धिजीवी व्यक्तींवर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जातीय दंगलीस (Riot) जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निषेध (Protests) नोंदविण्यात येत आहे. भिवंडी कमिटीच्या वतीने जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांचा कडकडीत निषेध करण्यात आला.