मूर्तिकारांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाबाबत निर्णय घ्यावा – आमदार विश्वनाथ भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : मूर्तिकारांच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. कल्याणात

कल्याण : मूर्तिकारांच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. कल्याणात मूर्ती बनवण्याचे अनेक घरगुती कारखाने असून घरातील सदस्यांमार्फत हे काम केले जाते. मात्र कोरोनामुळे असणाऱ्या लॉकडाऊनचा फटका मूर्तीकारांनाही बसला आहे. काही महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून अद्यापही सर्व काम बंद आहे. त्यामुळे कल्याणातील कुंभार समाज आणि मूर्तिकारांवर भविष्यात उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशमूर्तींसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली आहे.