ganesh immersion

दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी मुंबईसह ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त(Police Security In Thane And Mumbai) ठेवण्यात आला आहे. ठाण्यात विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक(Antigen Test Compulsory For Ganpati Immersion In Thane) करण्यात आली आहे.

    ठाणे: गणरायाचं(Ganeshotsav 2021) काल अनेक ठिकाणी वाजतगाजत आगमन झालं. आज दीड दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन(Ganpati Immersion) होत आहे. त्यासाठी ठाणे(Thane) आणि मुंबई(Mumbai) सज्ज झाली आहे.दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी मुंबईसह ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त(Police Security In Thane And Mumbai) ठेवण्यात आला आहे. ठाण्यात विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक(Antigen Test Compulsory For Ganpati Immersion In Thane) करण्यात आली आहे.

    ठाण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी ४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ठाण्यात एक लाख ४१ हजार २० घरगुती तर १ हजार ५८ सार्वजनिक बाप्पांचे ठाण्यात विराजमान होणार आहे.

    गणेश विसर्जन करताना कोरोना नियमांचे पालन व्हावे म्हणून ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून एकूण ४० ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये ७ घाट, १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्रांचा समावेश आहे. डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असणार आहे.

    या ठिकाणी श्रींचे विसर्जन करण्यासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार केल्या गेलेल्या www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करावा. ठाणेकरांनी www.ganeshvisarjan.covidthane.org या लिंकवर जाऊन आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचे टाइमस्लॉट बुक करावे. नागरिकांनी बुकिंग झाल्यानंतर एसएमएसद्वारे आलेली क्यूआर कोड रिसिट डाऊनलोड करून ठेवावी तसेच कोडची प्रिंट अथवा मोबाईलमधील कोड विसर्जन स्थळी असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून गणपतीचे रीतसर विसर्जन करावे. यासंबंधी काही तांत्रिक अडचण असल्यास ९८१९१७०१७० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सर्व गणेश भक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.