कर्नाटक सरकारचा पनवेलमध्ये जाहीर निषेध

पनवेल : पनवेल मध्ये कर्नाटकात बेळगाव मधील मानगुति या गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केल्या बद्दल कर्नाटक सरकारचा  जाहीर निषेध रविवार  ९ ऑगस्ट  रोजी  करण्यात आला. 

शिवसेना पनवेल शाखा येथे शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली रविवारी  सकाळी ११ वाजता  कर्नाटक  सरकार विरोधात घोषणा देऊन आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची  प्रतिमा पायदळी तुडवून  जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमूख  शिरीष घरत,रायगड जिल्हा सल्लागार  बबनदादा पाटील,उपजिल्हाप्रमूख रामदास पाटील,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,उपमहानगर प्रमूख दिपक घरत, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, शहर प्रमुख अच्युत मनोरे, सदानंद शिर्के, राकेश गोवारी, निलेश भगत, रुपेश ठोंबरे शहर संघटक प्रवीण जाधव,विभाग प्रमुख पद्माकर पाटील ,विलास कामोटकर,कुणाल कुरघोडे युवासेना, महिला आघाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  बेळगाव मधील मानगुति या गावामध्ये सन्मानाने  पुन्हा बसवावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली