डोंबिवलीत कर्नाटकातील येदियुरप्पा सरकारचा जाहीर निषेध

कर्नाटक सरकारच्या या कारवाईचा निषेध म्हणून आज डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख तथा जेष्ठ नगरसेवक राजेश मोरे यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील येदियुरप्पा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राजेश मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला.

डोंबिवली : सीमाभागातील मराठी भाषिकांची नेहमीच गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या कृतीमुळे बेळगावातील मराठी भाषिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला. त्यामुळे देशभरातील तमाम शिवसैनिक  प्रचंड संतापले आहेत.

कर्नाटक सरकारच्या या कारवाईचा निषेध म्हणून आज डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख तथा जेष्ठ नगरसेवक राजेश मोरे यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील येदियुरप्पा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राजेश मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी माजी नगरसेवक संजय पावशे, सतीश मोडक, अमोल पाटील, किरण पाटील, संजय मांजरेकर, आमोद वैद्य, संदीप नाईक, कुणाल ढापरे, अजय घरत यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी येदियुरप्पा यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पुन्हा त्याच जागेवर उभारण्यात आला पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांनी केली.