पर्स चोरताना चोरट्याला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

भिवंडी: शहरातील निजामपूरा परिसरातील भारत गॅस गोडाऊनच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ट्रक चालकाच्या घरात चोरट्याने रात्रीच्या सुमारास लोखंडी ग्रील नसलेल्या खिडकीतून घरात प्रवेश करून शिलाई मशीनवर

 भिवंडी: शहरातील निजामपूरा परिसरातील भारत गॅस गोडाऊनच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ट्रक चालकाच्या घरात चोरट्याने रात्रीच्या सुमारास लोखंडी ग्रील नसलेल्या खिडकीतून घरात प्रवेश करून शिलाई मशीनवर ठेवलेले पैशांचे पॉकेट चोरण्याचा प्रयत्न केला असता त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे.या चोरीप्रकरणी पर्स चोरट्याविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहसीन निझाम खान असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव असून त्याने ट्रक चालक रिजवान अहमद मो.रमजान अन्सारी  याच्या घरात काल रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण झोपलेले असताना लोखंडी ग्रील नसलेल्या खिडकीतून घरात प्रवेश करून शिलाई मशीनवर ठेवलेले पैशांचे पॉकेट चोरण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी रिजवान यास घरात चोरटा शिरल्याची चाहूल लागताच त्याने आरडाओरड करून कुटुंबियांना झोपेतून जागे केले व चोरटा मोहसीन यास पकडून निजामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.पोलीसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली असून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.या गुन्ह्याचा  पुढील तपास निजामपूरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही.एम.गुळवे करीत आहे.