ठाणे जिल्हा परिषदेने टाटा आमंत्रण इमारतीमध्ये सुरू केले स्वतंत्र क्वारंटाईन केंद्र

भिवंडी : भिवंडी ,कल्याण डोंबिवली , उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना अलगिकरण करून ठेवण्या साठी भिवंडी तालुक्यालीत

 भिवंडी : भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना अलगिकरण करून ठेवण्या साठी भिवंडी तालुक्यालीत राजनोली नाका येथील टाटा आमंत्रण या निवासी संकुलातील एमएमआरडीएच्या मालकीच्या इमारती मध्ये अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले .परंतु येथील अलगीकरण करून ठेवावयाच्या व्यक्तींची संख्या लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने स्वतंत्र १७१ जणांची व्यवस्था करणारे अलगीकरण केंद्र सुरू केले आहे .

भिवंडी तालुक्यातील राजनोली नाका येथे शासनाने सुरू केलेल्या क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडून भिवंडी महानगरपालिका यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या ठिकाणी भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरसह भिवंडी,कल्याण तालुक्यातील संशयितांना क्वारंटाईन करण्यात येत होते .मात्रदरम्यानच्या काळात महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषद प्रशासनास स्वतंत्र व्यवस्था टाटा आमंत्रण येथे राबविण्याच्या सूचना देत त्यासाठी १७१ रूम्स जिल्हा परिषद प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत . या इमारतीमधील तीन मजला वरील खोल्यां मधून ही व्यवस्था करण्यात येणार असून गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविस्तार अधिकारी राजू भोसले यांनी यासाठी कंबर कसली असून नुकताच या केंद्राची पाहणी नुकताच जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटील ,मुख्य कार्यकारी अधिकारी हिरामण सोनावणे ,हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,आरोग्य सभापती वैशाली चंदे यांनी केली .

जिल्हा प्रशासनाने भविष्या ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन  स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी हिरामण सोनावणे यांनी दिली .तर ही व्यवस्था ज्या तत्परतेने व जलदगतीने प्रशासनानाने कार्यवाही केल्या बद्दल अधिकारी कर्मचारी यांचे हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी अभिनंदन केले आहे .या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ मनीष रेंघे ,जिल्हा शिक्षणाधिकारी भागवत, गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन बरळ ,ग्रामविस्तार अधिकारी राजू भोसले आदी उपस्थित होते .