प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ठाण्यात(thane) व्होल्टास कंपनीच्या भूखंडावर आणि शेठ ग्रुप बिल्डरच्या वाहनतळावर ३६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या कोव्हीड सेंटरवर(covid center issue) भाजप नेते आणि भाजप नगरसेवक संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी १६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात १०० कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

ठाणे : ठाण्यात(thane) व्होल्टास कंपनीच्या भूखंडावर आणि शेठ ग्रुप बिल्डरच्या वाहनतळावर ३६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या कोव्हीड सेंटरवर(covid center issue) भाजप नेते आणि भाजप नगरसेवक संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी १६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात १०० कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यामुळे ठाण्यात कोव्हीड सेंटरवरून शिवसेना आमदार आणि भाजप नगरसेवकांमध्ये आरोपांचे वॉर सुरु झाले आहे.

राज्य शासन, सिडको, एम.एम.आर.डी.ए. व ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये व्होल्टास कंपनीच्या भुखंडावर व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर जे दोन कोविड सेंटर उभारले जात आहे त्यापैकी व्होल्टास कंपनीच्या भुखंडावर उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरबाबत आक्षेप घेतलेला आहे व एका प्रतापी आमदाराच्या आग्रहास्तव या कोविड सेंटरचे काम चालू आहे असल्याचा आरोप माजी खासदार सोमय्या आणि भाजप नगरसेवक वाघुले यांनी केला.

मात्र हे कोव्हीड सेंटर ही राज्य शासनाने दिलेल्या दुसऱ्या लाटेच्या पृष्ठभूमीवर बनविण्यात येत असल्याचा खुलासा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. व्होल्टास कंपनीच्या जागेवरील कोविड सेंटरचा खर्च अंदाजे १३ कोटी व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होत असलेल्या कोविड सेंटरचा खर्च २३ कोटीचा खर्च होणार असलायची महापालिकेची माहिती आहे.

आरोप करणारे संजय वाघुले ज्या ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. त्याच पालिकेच्या महासभेत आणि स्थायी समितीत दोन्ही विषयांना मंजुरी दिलेली असल्याचंही उल्लेख आ. प्रताप सरनाईक यांनी निवेदनात केला आहे. तर नगरसेवक संजय वाघुले यांनी खोपट येथील हायवेनजीक असलेल्या देवकार्पोरा इमारतीमधील शेठ ग्रुपच्या वाहन तळावरील होत असलेल्या कोविड सेंटरच्या कार्यालयातील कन्सल्टंटबरोबर त्यांची बैठक झाल्याची माहिती सीसीटिव्ही फुटेजचा पुरावा असल्याचा दावा केला आहे. शेठ ग्रुपच्या जागेवरील कोव्हीड सेंटरला आक्षेप न घेता संजय वाघुले यांनी व्होल्टास कंपनीच्या भूखंडारवर असलेल्या कोव्हीड सेंटरला आक्षेप नोंदविल्याने यात भ्रष्टाचार होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी आपण माजी खासदार किरीट सोमय्या व नगरसेवक  संजय वाघुले या दोघांचीही चौकशी करावी अशा मागणीचे पत्र आ.प्रताप सरनाईक यांनी लाललुचपत प्रितबंधक विभाग, ठाणे. पोलिस अधिक्षक, महेश पाटील याना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

प्रभागातील धोकादायक इमारती संदर्भात विकास प्रस्ताव तसेच रूम धारकांच्या समस्याबाबत विकासक जितू मेहता यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नाही.

- संजय वाघुले, भाजप नगरसेवक