भिवंडीत वाईन शॉपबाहेर तळीरामांची मोठी रांग

भिंवडी: केंद्र राज्य सरकारच्या आदेशाने दारुची दुकाने उघडण्याचे आदेश आल्यानंतर तळीरामांना दिलासा मिळाला. त्यामुळे आज सकाळपासून तळीरामांनी दारु खरेदीसाठी दारुच्या दुकानाबाहेर ३ किलोमीटरच्या रांगा

 भिवंडी : केंद्र राज्य सरकारच्या आदेशाने दारुची दुकाने उघडण्याचे आदेश आल्यानंतर तळीरामांना दिलासा मिळाला. त्यामुळे आज सकाळपासून तळीरामांनी दारु खरेदीसाठी दारुच्या दुकानाबाहेर ३ किलोमीटरच्या रांगा लावुन उभे राहिल्याचे भिवंडीमध्ये अनेक ठिकाणी चित्र दिसुन आले.शेलार येथील‌ नदी नाका,खारबांव,दापोडे,मानकोली,गोवेनाका,अंबाडी येथील दारुंच्या दुकानांबाहेर  तळीरामांनी एकाच गर्दी केली . संबंधित दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग व दर २ तासांनी निर्जंतुकीकरण, एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक राहणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे चित्र दिसुन आले. तर वाईन शॉप दुकानदार जादा पैसे घेऊन ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचा तक्रारी ठाणे डिव्हिजनचे उत्पादन शुल्क अधिकारी  नितीन घुले  याना अनेकांनी दूरध्वनीवरून तक्रारी केल्या मात्र ग्राहकांच्या तक्रारीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे याबाबत त्यांना संपर्क केला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.