पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने मंजुरी (Railways approves)  दिल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde ) यांनी दिली.

कल्याण : शिळ – कल्याण ( Shil – Kalyan) रस्त्यावरील पलावा परिसरातील वाहतूककोंडी (Traffic) दूर होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने मंजुरी (Railways approves)  दिल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde ) यांनी दिली. या उड्डाणपुलाच्या अंतिम आराखड्याला मंजुरी मिळून महिन्याभरात कामाला पुन्हा सुरुवात होईल.

शिळ-कल्याण रस्त्याच्या सहापदारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून याचाच एक भाग म्हणून पलावा गृहसंकुल परिसरात देसाई खाडी ते काटई टोल नाका अशा उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात आले होते. परंतु, या उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अतिरिक्त २ मार्गिकांसाठी जागा सोडण्याची विनंती हे काम करणाऱ्या प्राधिकरणाने केल्यामुळे या उड्डाणपुलाचा आराखडा बदलावा लागला. या उड्डाणपुलात एकूण ४५ फाऊंडेशन असून त्यापैकी ३७चे काम पूर्ण झाले आहे, तर ४५ पिलरपैकी १२चे काम पूर्ण झाले आहे.

आराखडा बदलावा लागल्यामुळे रेल्वेला सर्वसाधारण आराखडा पुन्हा मंजुरीसाठी पाठवावा लागला. आता मंजुरी मिळाली असून अंतिम आराखडाही महिनाभरात मंजूर होऊन कामाला सुरुवात होईल. या वर्ष अखेरीपर्यंत पत्री पूल वाहतुकीसाठी खुला होत आहे. तसेच पलावा उड्डाणपुलाच्या कामालाही सुरुवात होत असून वाहतुककोंडीतून दिलासा मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.