kasara crops

कसारा: लहरी पावसाने उघडीप घेतल्याने कसारा(kasara) पंचक्रोशीतील ७८२ हेक्टरवर घेण्यात आलेल्या भात पिकांच्या कापणीला वेग आला आहे. मात्र काही सखल भागाच्या शेतातील(farm) आडवी झालेली भात पिकं पाण्याखाली गेल्याने बळीराजाला ती काढणे अथवा कापणे अवघड झाले आहे.

कसारा: लहरी पावसाने उघडीप घेतल्याने कसारा(kasara) पंचक्रोशीतील ७८२ हेक्टरवर घेण्यात आलेल्या भात पिकांच्या कापणीला वेग आला आहे. मात्र काही सखल भागाच्या शेतातील(farm) आडवी झालेली भात पिकं पाण्याखाली गेल्याने बळीराजाला ती काढणे अथवा कापणे अवघड झाले आहे.

निसर्गाच्या अवकृपेतून शेतकरी अजूनही सावरलेला नसल्याचे भात कापणीतून दिसून येत आहे.कसारा परिसरातील शेतीच्या सखल भागात परतीच्या पावसाचे पाणी अजूनही ठाण मांडून असल्याने कापणी करताना शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे.ऐन भात कापणी हंगामात भात शेतीची परतीच्या पावसाने अक्षरशः दैना उडवली आहे. उभी भात पीक आडवी झाल्याने आजही ती पाण्याखाली असल्याने भाताला कोंब फुटले आहेत.

कसाऱ्यापासून १२ किमी अंतरावर असलेल्या विहिगाव परिसरात आजही पाण्याखाली गेलेली भात पिकं व ती देखील कोंब फुटलेली व कुजलेल्या अवस्थेतील कापणी करताना शेतकरी पाहायला मिळाला.या परिसरात शेतीतून पिकणारे भात पीक वर्षभराचे असल्याने शेतकरी वर्ग आपल्या शेतीत अपार मेहनत घेऊन शेती करतात.मात्र यंदाच्या लहरी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

जिवापाड जपलेले हातातोंडाशी आलेले सोनेरी पीक मुसळधारेच्या तडाख्यात आडवे पडले,भात पिकांची नासाडी झाली.भात कापणीला वेग आला खरा परंतु पावसाच्या पाण्याखाली असलेली भातरोप शेतातून कापणी करून खळ्यात आणणे अवघड झाले आहे.भिजलेली व कापणी झालेली भात पिकं सुखवण्याकरिता चार पाच दिवस उन्हात ठेवण्याची प्रक्रिया केली जात आहे.त्यानंतर शेतीच्या ठिकाणीच झोडून आपले वर्षभरातील पिकलेले धान्य घरापर्यंत नेण्याचे मोठे आव्हान शेतकरी वर्गापुढे निर्माण झाले आहे.याबाबत शेतात भात कापणी करत असलेले शेतकरी रामदास पारधी यांना विचारणा केली असता जे धान्य वाचलं ते आपलं,त्यामुळे त्याचे मोल पदरी पडेल याची शाश्वती नाही, असे त्यांनी सांगितले.