कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आमदार राजू पाटील यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

कल्याण : दिवसेंदिवस कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून याचा आढावा घेण्यासाठी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट

 कल्याण : दिवसेंदिवस कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून याचा आढावा घेण्यासाठी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काही भाग हा निळजे आरोग्य केंद्रात देण्यात आला असून त्यातले काही रुग्ण केडीएमसी हद्दीत राहत असताना देखील त्यांना ठाण्याला पाठवलं जात होतं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या रुग्णांचे उपचार पालिका हद्दीत करण्याची मागणी केली होती.  ही मागणी मान्य करण्यात आली असून या रुग्णांवर टाटा आमंत्रा येथे उपचार करण्यात येत आहेत. तसेच २७ गावातील सुमारे ५०० कर्मचारी कोरोनामध्ये सक्रियपणे काम करत असून त्यांच्या सुरक्षेसाठी विमा सरंक्षण देण्याची मागणी देखील करण्यात आली होती. याबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दाखवत या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचे मान्य केले आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना कोरोनाचे उपचार मोफत करण्यात येत असून सफेद रेशनकार्ड धारकांकडून खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी शुक्ल आकारण्यात येत असल्याकडे देखील आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांचे लक्ष वेधत सर्वांना मोफत उपचार करण्याची मागणी केली. याबाबत सरकार सकारात्मक असून येत्या दोन दिवसांत यावर निर्णय येणार आहे. पालिकेच्या वतीने देखील याचा पाठपुरावा सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.