तबलिगींना कल्याण डोंबिवली शहरातून दुसरीकडे न्या – आमदार राजू पाटील यांची पालकमंत्री आणि आयुक्तांकडे मागणी

डोंबिवली : डोंबिवली,पाथर्ली येथे बीएसयुपी जवळ २५ तबलिगींना ठेवण्यात आले आहे, याच गोष्टींची माहिती आजूबाजूच्या परिसरात समजल्यावर लोकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण झाले आहे.त्यामुळे आधीच

 डोंबिवली : डोंबिवली,पाथर्ली येथे बीएसयुपी जवळ २५ तबलिगींना ठेवण्यात आले आहे, याच गोष्टींची माहिती आजूबाजूच्या परिसरात समजल्यावर लोकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण झाले आहे.त्यामुळे आधीच कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या डोंबिवलीत या लोकांची उपस्थिती जर लोकांमध्ये भीती निर्माण करत असेल व त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवावे आणि पूर्वीच्या ठिकाणी क्वारंटाईन करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.तसेच त्यांनी आयुक्तांना पत्र सुद्धा लिहले आहे.

आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यात कल्याण डोंबिवलीचा महाराष्ट्रात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागत आहे.आपल्या इथे हा रोग पसरण्यासाठी इथे नाममात्र असलेली आरोग्यसेवा तसेच काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. आपण नुकतीच केडिएमसीचे आयुक्त म्हणून सुत्र हाती घेतली असली, तरीही आपण या परिस्थितीतही कोरोनाशी दोन हात करताना जनतेला दिसत आहात. जेव्हा डोंबिवली हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला होता व त्याच सुमारास कल्याणहून रस्त्यावर फिरणाऱ्या साधारण पंचवीस एक लोकांना आपण पाथर्ली येथील बीएसयुपीत क्वारंटाइन केल्याचे समजले, तेव्हाच मी सुरूवातीलाच आपणास आधीच धोकादायक होत चाललेल्या डोंबिवलीत रहिवासी भागात अजून बाहेरचे संशयीत रूग्ण आणू नका अशी फोनवर विनंती केली होती. याच पाथर्ली भागात मागच्याच काही दिवसांपूर्वी कोरोनाचा एक रूग्ण आढळून आला होता. तसेच येथून जवळच असलेला आजदे सागर्ली भाग पण हॉटस्पॉट जाहीर केला आहे, अशातच आज मला समजले की त्यानंतरही काही संशयीत रूग्ण ज्यामध्ये काही तबलिगी यांचा समावेश आहे,असे एकूण १०० च्या वर  लोक इथे ठेवले आहेत. हॉटस्पॉटमध्ये आढळून आलेले रूग्ण त्या जागेपासून दूर नेणे अपेक्षित असताना, उलट बाहेरचे संशयित या शहरात दाट वस्तीच्या ठिकाणी आणणे योग्य नाही व याच गोष्टींची माहिती आजूबाजूच्या परिसरात समजल्यावर लोकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत या तबलिगींची उपस्थिती जर लोकांमध्ये भीती निर्माण करत असेल व त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर इतरत्र हलवावे. आता या    मागणीनंतर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे पहावे लागेल.