जुन्या निळजे पुलावरून किमान हलकी वाहने सोडण्याची आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण : कल्याण-शिळ मार्गावरील जुना निळजे पूल तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीला केली आहे. कल्याण शिळ

 कल्याण : कल्याण-शिळ मार्गावरील जुना निळजे पूल तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीला केली आहे. कल्याण शिळ मार्गावरील निळजे गावातील रेल्वे ट्रॅकवर असणारा जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार असून त्याऐवजी शेजारील नवीन पुलावरून सर्व वाहतूक वळवली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हा पूल वाहतुकीला बंद झाल्यानंतर वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परिणामी या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून किमान हलक्या वाहनांसाठी तरी तो सुरू ठेवण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.