नांदीवलीतील नागरिकांच्या समस्येची दखल घेत आमदार राजू पाटील यांनी केला पाहणी दौरा

कल्याण : नांदीवली येथील स्वामी समर्थ मठाजवळील परिसरात गेली ४ वर्षे पावसाळयात कमरेभर पाणी साठुन होणारा त्रास बंद व्हावा, यासाठी येथील नागरिकांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना

 कल्याण : नांदीवली येथील स्वामी समर्थ मठाजवळील परिसरात गेली ४ वर्षे पावसाळयात कमरेभर पाणी साठुन होणारा त्रास बंद व्हावा, यासाठी येथील नागरिकांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना पत्रव्यवहार केला होता. त्याबाबत आमदारांनी आज पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यामध्ये रहिवाश्यांनी गेली ४ वर्षे होणाऱ्या त्रासाबद्दल आमदारांना अवगत केले व या त्रासातून कायमची मुक्तता करावी, अशी विनंती केली.

यावेळी आमदार राजू पाटील यांनी येत्या पावसाळयात तात्पुरत्या स्वरुपात काय करता येईल याची माहिती उपस्थितांना दिली. पाणी साचू नये यासाठी संबंधित विभागाला तात्काळ सूचना दिल्या. त्याचबरोबर संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंप व बोटी स्वखर्चाने उपलब्ध करुन देऊ असे सांगितले. त्याचबरोबर नांदिवली नाला भर टाकुन बुजवण्यात आल्याचे निदर्शनास येताच हा नाला तात्काळ मोकळा करण्यास अधिकारी वर्गाला सांगितले. दिवाळीनंतर या रस्त्यावर दोन्ही बाजुस गटारे व भूमीगत गटार व पक्का रस्ता करुन दिला जाईल, असे यावेळी आमदारांनी सांगुन नागरिकांना आश्वस्त केले.

 यावेळी परीसरातील नागरिकांनी पत्र दिल्यावर लगेच त्याची दखल घेऊन पाहणी केल्याबद्दल आमदार राजू पाटील यांचे आभार मानले. या पाहणी दौऱ्यावेळी माजी नगरसेवक मनोज घरत, हर्षद पाटील महापालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता किरण वाघमारे, ड्रेनेज विभागाचे मालगुंडी व परिसरातील शेकडो नागरीक उपस्थित होते.