Ransom case against Khalid Guddu

खालिद गुड्डू व इफतेखार उर्फ बबलू यांची भिवंडी शहरात दहशत असल्याने फिर्यादी याने भीतीपोटी तक्रार देण्याचे टाळले परंतु २४ सप्टेंबर रोजी खालिद गुड्डू व वरील तीन जणां विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होऊन ते सर्व आरोपी तुरुंगात असल्याने फिर्यादी अन्वर हुसेन मंगतुद्दीन निरबान यांनी हिम्मत एकवटून या चौघां विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

भिवंडी : भिवंडी पोलीस उपायुक्त क्षेत्रात एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू व त्याच्या सहकाऱ्यां विरोधात खंडणी चे गुन्हे दाखल होण्याची सुरू झालेली परंपरा अजून ही खंडित होत नसून गुन्हे शाखा ठाणे सह शांतीनगर ,निजामपूरा ,शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यां नंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात ही खालिद गुड्डू व त्याच्या भावासह दोन साथीदारां विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे .

अन्वर हुसेन मंगतुद्दीन निरबान यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांनी सन २०१६ पासून केलेल्या इमारत बांधकामा संदर्भात खालिद गुड्डू शेख ,त्याचा भाऊ इफत्तेखार उर्फ बबलू ,साथीदार गुलाम अब्दुल रज्जाक खान ,फैज आलम नूर आलम खान यांनी संगनमत करून महानगरपालिका येथे त्यांच्या इमारत बांधकामा संदर्भात तक्रारी करून फिर्यादी कडून बळजबरीने सात लाख रुपये वसूल केले तर गुलाम अब्दुल रज्जाक खान याच्या रोशनबाग येथील कार्यालयात बोलावून फिर्यादीच्या लँडमार्क या इमारती मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट व तळ मजल्यावरील पार्किंग च्या जागेत कोणताही मोबदला न देता रूम बनवून घेऊन या दोन्हींचे बक्षिसपत्र लिहून घेत बळकावली. तर जीलानी कॉम्प्लेक्स येथील फ्लॅट्स क्रमांक ५०४ ,५०५ हा फिर्यादीने अक्रम खान यांना विक्री केलेला असताना इफतेखार उर्फ बबलू व गुलाम अब्दुल रज्जाक खान यांनी खालिद गुड्डू याच्या सांगण्या वरून सदरचे फ्लॅट चा ताबा गजाला अन्सारी हिला दिला.