राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजुंच्या जेवणाची सोय

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू नागरिकांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून दररोज ५०० जणांना मोफत

 कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू नागरिकांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून दररोज ५०० जणांना मोफत जेवण देण्यात येत आहे.  ५ एप्रिल ते ३ मे या काळात लॉकडाऊन असेपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष प्रसाद महाजन हे स्वतः दररोज ५०० गरजु, अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध लोकांना जेवणाची सुविधा पोहचवत आहेत. कल्याण शहरातील स्टेशन परिसर तसेच इतर भागात दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेस हे जेवण देत असल्याने अनेक निराधारांना आधार झाला आहे.