रेशनिंग दुकानदाराच्या भ्रष्टाचारा विरोधात साजईतील महिलांनी तहसिलदारांकडे केली तक्रार

मुरबाड: ऐन लॉकडाऊनमध्ये नागरिक पोटाला चिमटे काढून दिवस ढकलत असताना मुरबाड तालुक्यातील रेशनिंग दुकानदार सुधारायचे नाव घेत नाहीत.साजई येथील दुकानदाराने तर शिधापत्रिकाधारकांकडून शिधापत्रिका

 मुरबाड: ऐन लॉकडाऊनमध्ये नागरिक पोटाला चिमटे काढून दिवस ढकलत असताना मुरबाड तालुक्यातील रेशनिंग दुकानदार सुधारायचे नाव घेत नाहीत.साजई येथील दुकानदाराने तर शिधापत्रिकाधारकांकडून शिधापत्रिका बी.पी.एल.मध्ये समाविष्ट करण्याचे पैसे घेतल्याची ओरड करत महिलांनी तहसिलदार कार्यालयात धाव घेतली. मात्र ढिम्म कारभारामुळे तालुक्यात सार्वजनिक रेशनिंग वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. 

 
तालुक्यातील साजई येथे २६०  शिधापत्रिकाधारकांना रेशनिंगचा लाभ मिळतो. यातील बहुसंख्य शिधापत्रिकाधारकांना प्राधान्याचे रेशनिंग मिळते.या योजनेपासून वंचित असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना दुकानदाराने तुमच्या शिधापत्रिकेचा बी.पी.एल.योजनेत समावेश करतो असे सांगून शिधापत्रिकाधारकांकडून प्रत्येकी एक हजार ते बाराशे रुपये घेतल्याचा आरोप करत सोमवारी येथील महिलांनी फिजिकल डिस्टन्स पाळत पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पुरवठा अधिकारी बंडू जाधव यांनी नेहमीप्रमाणे महिलांना थातुरमातुर उत्तरे देत वेळ मारून नेली.यापूर्वीही रेशनिंग पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची तालुक्यात सर्वत्र बोंब आहे.याबाबत गाव पातळीवरील सामजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी तहसीलदार कार्यालयास कळवत आहेत, मात्र तरीही हा सावळागोंधळ कायम आहे.