रायते हद्दीतील अतिक्रमणावर महसूल विभाग व ग्रामपंचायतीच्या कारवाईचा बडगा

कल्याण : कल्याण तालुका ग्रामीण भागातील रायते ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षापासून गुरचरण जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे याबाबत तक्रारीच्या माध्यमातून

कल्याण : कल्याण तालुका ग्रामीण भागातील रायते ग्रामपंचायत हद्दीत  अनेक वर्षापासून गुरचरण जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे याबाबत तक्रारीच्या माध्यमातून याबाबीकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्याचबरोबर हे अतिक्रमण हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखील याबाबत पाठपुरावा केला होता. येथील सरपंचांनीदेखील याबाबत प्रशासनाकडे  पत्रव्यवहार केला होता. परंतु कारवाईसाठी कुठलेही पावले उचलले जात नव्हते. अखेर सोमवारी या कारवाईला मुहूर्त मिळाला. सरपंच पद्मश्री जाधव व मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांनी धडक कारवाईचा बडगा उचलीत गुरुचरण जागेवरील अतिक्रमण हटविले.

कल्याण तालुक्यातील रायते ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे वीस एकर भूखंडावर काही व्यक्तींनी अतिक्रमण करून बांधकाम व इतर गोष्टी केल्या होत्या. याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व सरपंच यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करत, संबंधित बांधकाम निकषित करण्यासाठी पत्र व्यवहार केले होते. याची दखल घेत कल्याण उपविभागीय अधिकारी नितीन महाजन व कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडून सदर अतिक्रमण आठविण्या संदर्भात आदेश‌ देखील काढण्यात आले‌ होते.  परंतु या अतिक्रमणावर  कारवाई केली जात नव्हती. परंतु या बाबत ठाम भूमिका घेत गुरुवारी मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांनी स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांची मिटिंग घेऊन संबंधित अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर सोमवारी या अतिक्रमण केलेल्या भूखंडावर बांधकाम व इतर गोष्टी निकषित करून संबंधित भूखंड शासनाच्या ताब्यात घेतले असून सदर ठिकाणी फलक देखील लावण्यात आले आहेत. कारवाई दरम्यान काही प्रमाणात अतिक्रमण धारकांनी विरोध केला परंतु या विरोधाला न डगमगता कारवाई पूर्ण करण्यात आली.

या कारवाईमुळे स्थानिकांतून मंडळ अधिकारी साळुंखे, सरपंच जाधव व सदस्य यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अशा प्रकारची अतिक्रमण केलेल्या गुरुचरण जागेवरील ही तालुक्यातील पहिलीच कारवाई असल्याचे सर्वच स्थरातून बोलले जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायत व मंडळ अधिकारी यांनी अशा प्रकारे तालुक्यातील गुरचरण जागेवर झालेल्या भूखंड बाबत कारवाई केली, तर शासकीय भूखंड मोठ्याप्रमाणात मोकळा श्वास घेतील असे चित्र या निमित्ताने दिसत आहे.या कारवाईत सरपंच पद्मश्री जाधव, उप सरपंच संदिप सुरोशी, सदस्य हरेश पवार, सुभाष जाधव, कमल सुरोशी, निर्मला गोडांबे,  मंडळ अधिकारी संजय साळुखे, तलाठी हनुमंत जाधव, ग्रामसेवक पवार, पो.उ.नि. प्रदिप आरोठे, पो. ना. किशोर आयरेकर आदींनी मोलाची भूमिका बजावली. प्रशासनाने संदर्भीत गुरचरण जागेवरील अतिक्रमणाबाबत नोटीस बजावल्या होत्या. शासकीय गुरचरण भूखंडावर अतिक्रमण  करीत रस्ता निर्मिती, शेती बनवणे बांधकाम करण्यात आला होते.   सुमारे २० एकर गुरचरण  जागा असलेल्या भुखंड असलेल्या या जागेत  आतिक्रमण करीत  बांधकाम विकसित केले होते. ही अनाधिकृत अतिक्रमण केलेली बांधकामे शासनाच्या ताब्यात घेण्यात आली असून संबंधित जागेवर ग्रामपंचायत फलक लावण्यात आले आहेत.