ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर, विनाचाचणी येणाऱ्या  परप्रांतीयामुळे रुग्णसंख्येत वाढ

ठाण्यातील वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणे स्थानकावर रुग्णांच्या चाचण्या आणि ठाण्यातील इतर परिसरातील चाचण्या वाढविल्या आहेत. मात्र ठाणे स्थानकावर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय हे कोरोना चाचणी न करता ठाण्यात दाखल होत आहेत.

ठाणे : ठाण्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी जास्त होत असला तरी कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. गुरुवारी ९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर सध्या ठाण्यात १७०२ रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. तर ठाण्यात अनेक परप्रांतीय कोरोनाची चाचणी न करताच दाखल होत असल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढत असल्याचं चित्र आहे.

ठाण्यातील वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणे स्थानकावर रुग्णांच्या चाचण्या आणि ठाण्यातील इतर परिसरातील चाचण्या वाढविल्या आहेत. मात्र ठाणे स्थानकावर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय हे कोरोना चाचणी न करता ठाण्यात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असून पालिकेच्या नियोजांचा फज्जा उडत आहे.

ठाणे स्टेशन परिसरात बाहेरच्या राज्यातून  येणाऱ्या लोकांच्या चाचण्या केल्यानंतर रोज १० ते १५ रुग्ण पॉझिटीव्ह येत असल्याचं चाचणी करणारे कर्मचारी सांगतात. तर अनेक प्रवासी गर्दीमुळे ठाणे स्थानकावर  कोरोनाची चाचणी न करताच ठाण्यात प्रवेश करतात. अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे.