कळवा घोलाईनगर मधील १०० ते १५० कुटुंबांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर

दरड कोसळण्याच्या या दुर्दैवी घटनेत पाच जणांचा ढिगाऱ्याखाली दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलेल्या या १०० ते १५० कुटुंबीयांची व्यवस्था सध्या पालिका प्रशासनाने पालिकेच्या शाळेमध्ये केली आहे. पावसाचा जोर अधिक वाढल्याने बचावकार्य थांबवण्यात आलं असून, हा भाग खचत असल्याने टीडीआरएफचे जवान घटना स्थळाजवळ थांबून आहेत.

    ठाण्यात दरड कोसळून झालेल्या जीवित हानी बाबत पालिका प्रशासनाने सावधानता बाळगत घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घोलाई नगरमधील आसपासच्या १०० ते १५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे.

    दरड कोसळण्याच्या या दुर्दैवी घटनेत पाच जणांचा ढिगाऱ्याखाली दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलेल्या या १०० ते १५० कुटुंबीयांची व्यवस्था सध्या पालिका प्रशासनाने पालिकेच्या शाळेमध्ये केली आहे. पावसाचा जोर अधिक वाढल्याने बचावकार्य थांबवण्यात आलं असून, हा भाग खचत असल्याने टीडीआरएफचे जवान घटना स्थळाजवळ थांबून आहेत.

    ठाण्यातील कळव्यात घोलाईनगर झोपडपट्टी भागात दरड कोसळली. सोमवारी १९ जुलै दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दरड कोसळण्याची घटना घडली तेव्हा शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मृतांमध्ये १ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.

    दरम्यान, मुंबईत सोमवारी पावसाची संततधार होती. मुंबईच्या पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात एक भिंत कोसळल्याची घटना घडली. शहरात ५, पूर्व उपनगरात ४ व पश्चिम उपनगरात दोन झाडे कोसळली. मुलुंड पूर्व येथे झाड पडून जखमी झालेल्या एका व्यक्तीला हिरामुंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात आणि पूर्व उपनगरात तीन ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहर आणि उपनगरातील वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.