राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २१ वर्ष पूर्ण केले असून यानिमित्त सामाजिक उपक्रमातून वर्धापनदिन साजरा करण्याचे आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी

 कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २१ वर्ष पूर्ण केले असून यानिमित्त सामाजिक उपक्रमातून वर्धापनदिन  साजरा करण्याचे आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने संपूर्ण वर्ष लोकसेवेसाठी अर्पण करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान राबविण्यात येत असून या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी केले आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने कोविड काळात केलेल्या मदतकार्याची आणि राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हनुमंते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील रोकडे, राष्ट्रवादी जिल्हा सचिव ब्रम्हा माळी, नेतिवली विभाग अध्यक्ष शमीन शेख, जिल्हा सचिव सूर्या पटेल, सलाम शेख, नईम खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. यासाठी शरद पवार यांनी राज्यभर रक्तदान शिविराचे नियोजन जिल्हा आणि तालुका पातळीवर करण्यास सांगितले होते. त्यास भव्य प्रतिसाद देत कल्याण-डोंबिवली जिल्ह्यात रक्तदात्यानी रक्तदान करुन या लढाईत आपले योगदान दिले आहे. जिल्हाभरातील लोकांना मदत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रियपणे कार्यरत असून रेशन वितरण, वैद्यकीय शिबिरे, अन्न वितरण, सामुदायिक स्वयंपाकघर यांसारखे लोकोपयोगी उपकरम राबविले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांची मते, सूचना जाणून घेण्यासाठी, तळागाळातील प्रश्न समजून घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ हा अनोखा उपक्रम राबवित असून कोरोनाचा सामना करताना तसेच येणारया काळात विविध प्रश्नांना तोड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दिलेले अभिप्राय मोलाचे ठरतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी व्यक्त केला आहे.  कोरोनाच्या उद्रैकातील कठीण काळात पक्षाची तत्त्वे पाळणे आणि लोकांना मदत करणे यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कोविड लढ्याचा सामना व ‘नागरीकांना मदत आणि ‘तळागाळातील प्रश्न” समजून घेण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा उपक्रम फायदेशीर ठरणार असून आपले अभिप्राय पक्षाला देण्यासाठी httpso:/bit.ly/RashtravadipakshAbhipraay या लिंक वर फॉर्म भरण्याचे आवाहन हनुमंते यांनी केले आहे.