Repercussions of change of officers in the General Assembly All departments of TMC will have operations Mayor Naresh Mhaske

यापूर्वी महापालिकेकडून पदाची खैरात वाटली जात होती. असा धक्कादायक गौप्यस्फोट महापौर नरेश म्हस्के यांनी केला. या संदर्भात मी त्यावेळेस पत्रव्यवहारही करुन त्यावर कारवाई झाली नव्हती. यापूर्वी चुकीच्या पध्दतीने पदांचे वाटप झाले होते. त्यामुळे काहींवर अन्याय देखील झाला आहे. परंतु आता प्रशासनाकडून योग्य स्वरुपात पावले उचलण्यात आली आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रितसर प्रकिया न करता पदोन्नती देण्यात आलेल्यांना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चांगलाच धक्का दिला आहे. या प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी संपन्न झालेल्या महासभेत उमटले असून अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या यापूर्वीच्या बढत्या चुकीच्या पध्दतीने होत्या का?, त्यांना कोणत्या कायद्यानुसार बढती दिली किंवा त्यांना आता पुन्हा मूळ पदावर कसे आणले गेले त्यांना दिलेला कार्यभार हा बेकायदेशीर होता का? असे अनेक सवाल उपस्थित करीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

दरम्यान यापूर्वी अधिकाऱ्यांना पदांची खैरात देण्यात आल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट महापौर नरेश म्हस्के यांनी केला. परंतु आता ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवली जात असून आकृती बंधानुसार पदे भरली जात असल्याने त्यानुसारच इतर विभागातील अधिकाऱ्यांना देखील न्याय द्यावा असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. तसेच केवळ काही ठरविक विभागांचे ऑपरेशन न करता सर्वच विभागांचे ऑपरेशन करावे असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी महापालिकेकडून पदाची खैरात वाटली जात होती. असा धक्कादायक गौप्यस्फोट महापौर नरेश म्हस्के यांनी केला. या संदर्भात मी त्यावेळेस पत्रव्यवहारही करुन त्यावर कारवाई झाली नव्हती. यापूर्वी चुकीच्या पध्दतीने पदांचे वाटप झाले होते. त्यामुळे काहींवर अन्याय देखील झाला आहे. परंतु आता प्रशासनाकडून योग्य स्वरुपात पावले उचलण्यात आली आहेत. आकृती बंधानुसार आता पदे दिली जात आहेत. त्यानुसार आता केवळ एकाच विभागाच्या बाबतीत हे ऑपरेशन न करता सर्वच विभागांचे या पध्दतीने ऑपरेशन करावे असे आदेशही महापौर म्हस्के यांनी दिले.