कोरोना युद्धासाठी पुन्हा ‘ते’ निवृत्त आरोग्य कर्मचारी कोरोनासाठी लढा देणार

वाडा -पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आणि तालुका वैद्यकीय कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक काम करणारे दोन आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग यांचा नुकताच सेवा

वाडा – पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आणि तालुका वैद्यकीय कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक काम करणारे दोन आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग यांचा नुकताच सेवा निवृत्ती सेवा पार पडला. हे कोरोना योद्धे वयोमानानुसार निवृत्त झाले असले तरी ते स्वेच्छेने कोरोनासी लढण्यास पुन्हा ते आपली सेवा देणार असल्याची माहिती तालुका वैधकीय अधिकारी डॉ. संजय बुरपले यांनी बोलताना माहिती दिली.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पालसई  गावातील श्रीमती आर.डी.पाटील या गोऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यीका पदावर कार्यरत होत्या.त्यांचे पती डी. व्ही.पाटील हे सुद्धा आरोग्य सेवेत सेवानिवृत्त झाले आहेत.श्रीमती पाटील याना आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम गोऱ्हे येथे नुकताच पार पडला. हे दाम्पत्य आरोग्य सेवेसाठी कार्यरत होते . तसेच  वाडा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील श्री रमेश भागोजी ठाकरे हे सुद्धा नियत वयोमानानुसार ३५ वर्षे सेवा करून तालुका आरोग्य पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झाले.तेही आपली सेवा कोरोनासाठी देणार असल्याचे तालुका वैधकीय अधिकारी डॉ. संजय बुरपले यांनी बोलताना माहिती दिली.त्यांचा निवृत्ती सोहळा नियमानुसार सामाजिक अंतर पाळत पार पडला.