bhivandi tehasildar

गेल्या चार दिवसांपासून भिवंडी तालुक्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. सध्या तालुक्यात शेतकर्‍यांचा भातपिक कापणीचा हंगाम हंगाम सुरू झाला असून हजारो एकर जमिनीतील कापणी झाली आहे, तर उर्वरित भातपिकही कापणी योग्य झाले आहे. मात्र सद्यस्थितीत पडत असलेल्या या अवेळीच्या पावसामूळे भिवंडी तालुक्यातील कापलेली व न कापलेलीही भातपिके पाण्याखाली जाऊन भातपिक व त्याचे तण (पेंढा ) भिजून शेतकऱ्यांची संपूर्ण वर्षासाठीची मेहनत फुकट गेली आहे.

भिवंडी : गेले चार दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसामूळे भिवंडी तालुक्यातील भातपिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या पिकांचे त्वरीत पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना अर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आवळे ग्रुप विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटीचे उपसभापती विनोद पाटील यांनी भिवंडीचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना एका  निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या चार दिवसांपासून भिवंडी तालुक्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. सध्या तालुक्यात शेतकर्‍यांचा भातपिक कापणीचा हंगाम हंगाम सुरू झाला असून हजारो एकर जमिनीतील कापणी झाली आहे, तर उर्वरित भातपिकही कापणी योग्य झाले आहे. मात्र सद्यस्थितीत पडत असलेल्या या अवेळीच्या पावसामूळे भिवंडी तालुक्यातील कापलेली व न कापलेलीही भातपिके पाण्याखाली जाऊन भातपिक व त्याचे तण (पेंढा ) भिजून शेतकऱ्यांची संपूर्ण वर्षासाठीची मेहनत फुकट गेली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्गाच्या या लहरीपणामुळे हिरावून गेला आहे.

यामुळे शेतकर्‍यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या झालेल्याया मोठ्या नुकसानीची त्वरीत दखल घेऊन तत्काळ भिवंडी तालुक्यातील भातपिकांचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे आवळे ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे उपसभापती विनोद पाटील यांनी भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.