bhivandi wet crops

भिवंडी: भिवंडी(bhivandi) तालुक्यात बळीराजाची शेतातील भातपिके चांगली तयार झाली होती. ती धान्यांनी भरलेली  पिके(rice crop loss by rain)शेतात डोलत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हैदोस घातला. त्यामुळे बळीराजाच्या शेतातील भातशेती पावसाने आडवी झाली.

भिवंडी: भिवंडी(bhivandi) तालुक्यात बळीराजाची शेतातील भातपिके चांगली तयार झाली होती. ती धान्यांनी भरलेली  पिके(rice crop loss by rain)शेतात डोलत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हैदोस घातला. त्यामुळे बळीराजाच्या शेतातील भातशेती पावसाने आडवी झाली.शेतात कुटुंबियांसह काबाडकष्ट करून पिकविलेले हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हिरावला.

भिवंडी तालुक्यातील पडघा ,अंबाडी ,खानिवली ,वडवली ,अनगांव, कवाड,कुंदे ,दिघाशी ,नांदकर ,बापगांव ,मुठवळ, चिंबीपाडा, कुहे ,धामणे, खारबांव ,पाये ,पायगांव ,खार्डी ,एकसाल ,सागांव ,जुनांदुर्खी ,टेंभवली ,पालीवली, गाणे,फिरिंगपाडा ,बासे ,मैदे ,पाश्चापूर या भागात हजारो एकर भातशेती पिकविली जाते. यंदा भातपिक ही चांगले आल्याने शेतकरी आनंदित होता. मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला भात पिकाचा घास हिरावून मातीमोल  केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून तब्बल १६ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.

शेतात कापुन ठेवलेले भाताचा प्रत्येक दाणा वाचवण्यासाठी भिजलेले भात पीक सुकवण्यासाठी चक्क भिवंडी – वाडा रोड वरील रस्ते दुभाजकावर ठेवण्याची शेतकऱ्याची धडपड पाहावयास मिळत आहे .शेतकरी हवालदिल झालेला असताना कृषी व महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या या हतबलतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने जगावं की मरावं अशी अवस्था शेतकऱ्यांची  स्थिती झाली आहे.