प्रयोगशील शेतकऱ्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीच्या प्रयोगासाठी दिले तांदूळ मोफत

वाडा : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत ८७ कोरोना संसर्गित रुग्ण आहेत. त्याच बरोबर कोरोना बाधितांच्या संपर्कातील

वाडा : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत ८७ कोरोना संसर्गित रुग्ण आहेत. त्याच बरोबर कोरोना बाधितांच्या संपर्कातील क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना वाडा तालुक्यातील पालसई गावातील प्रयोगशील शेतकरी किरण पाटील यांनी कोरोना बाधित व संपर्कात आलेले रुग्णांना वाड्याच्या प्रसिद्ध वाडा कोलम व वाडा झिनिया या भाताची पेज व भात तयार करून देण्यासाठी मोफत तांदूळ उपलब्ध केले आहेत. वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बुरपले यांनी ही माहिती दिली आहे.

या वाडा कोलम आणि वाडा झीनिया तांदळाच्या पौष्टीकतेने कोरोनाबाधित रुग्णाची आणि संपर्कातील रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल आणि कोरोना विरोधात लढण्यास त्याची रोग प्रतिकार शक्ती वाढेल या हेतूने हा रुग्णाला तांदुळाची पातळ पेज आणि भात दिला जाणार आहे,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बुरपुले यांनी  दिली. वाडा तालुक्यातील पोशेरी येथे एका शाळेच्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील क्वारंटाईन केलेले रुग्ण व सौम्य लक्षणे असलेले ऑक्सीजन पुरवठा होत असलेल्या येथील रुग्णांना हा आहार येथे देण्यात येणार आहे.
हा जरी प्रयोग असला तरी या तांदळामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढणार असल्याचा दावा प्रयोगशील तज्ञ शेतकरी किरण पाटील यांनी सांगितले.ही जर मात्रा कोव्हीड १९ रुग्णाला लागू पडली तर जिल्हा स्तरावर हा मी कृषी व्हेज कंपनीकडून विकसित केलेला वाडा कोलम आणि वाडा झिनिया तांदूळ  मोफत उपब्धत करून देईन, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले. हा तांदूळ उपलब्ध करून देत असताना वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या आहार तज्ञ श्वेता येलने इतर आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.