rickshaw

जागतिक कोरोना (Corona) संकटकाळात रिक्षाचालक अडचणीत सापडला आहे. रिक्षाचालकांचे(Rickshaw Drivers Loan) फायनान्स कंपन्या, बँका आणि वित्तिय संस्थांकडून रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे(Loan) हप्ते थकित आहेत.

    कल्याण : कोरोना काळात(Corona) रिक्षाचालकांचे(Rickshaw Drivers) थकित कर्ज हप्त्यांसाठी पुर्नरचना करुन मुदतवाढ द्यावी याकरीता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank Of India) कोकण विभाग महासंघाने विनंती पत्र पाठवले आहे.

    जागतिक कोरोना संकटकाळात रिक्षाचालक अडचणीत सापडला आहे. रिक्षाचालकांचे फायनान्स कंपन्या, बँका आणि वित्तिय संस्थांकडून रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकित आहेत. अडचणीच्या या काळात थकित हप्ते रिक्षाचालकांना एकरकमी भरणे अशक्य आहे. बजाज फायनान्स, बँका व वित्तीय सस्थां यांनी थकित कर्ज हप्ते मुदतवाढ करुन कर्ज पुर्नरचना करणे रास्त व अपेक्षीत मागणी आहे. मात्र आरबीआयच्या काही तांत्रिक नियमांमुळे अशक्य आहे.

    रिक्षाचालकांना थकीत कर्ज पुर्नरचना व मुदत वाढीकरीता नियमांमध्ये शिथीलता द्यावी जेणेकरुन रिक्षाचालकांना दिलासा मिळेल याकरीता कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाने आरबीआयला पत्र दिले आहे.