dombivali road

कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महापालिका प्रशासन हवामान खात्याच्या अंदाजानुसार कामकाज करीत असून अद्याप परतीच्या पावसाला विलंब लागणार आहे. पावसामुळे डांबरप्लांट बंद असून रस्त्याच्या कामासाठी लागणारी डांबर मिळणे कठीण आहे. त्यामुळे आठवड्यानंतर डांबरप्लांट सुरू झाल्यावर पालिका परिक्षेत्रातील खड्डेमय चाळण झालेल्या रस्त्यांची डागडुजी(road repair work) करून ‘डांबरपट्टी’ लावण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या शहर अभियंतानी दिली आहे.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महापालिका प्रशासन हवामान खात्याच्या अंदाजानुसार कामकाज करीत असून अद्याप परतीच्या पावसाला विलंब लागणार आहे. पावसामुळे डांबरप्लांट बंद असून रस्त्याच्या कामासाठी लागणारी डांबर मिळणे कठीण आहे. त्यामुळे आठवड्यानंतर डांबरप्लांट सुरू झाल्यावर पालिका परिक्षेत्रातील खड्डेमय चाळण झालेल्या रस्त्यांची डागडुजी(road repair work) करून ‘डांबरपट्टी’ लावण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या शहर अभियंतानी दिली आहे.

पालिका परिक्षेत्रातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली असून गेल्या आठवड्यात खड्ड्यांमुळे अपघातात नागरिक जखमी झाले आहेत. याबाबत सर्वच राजकीयपक्षांनी आंदोलनाचा इशाराही दिला असला तरी पालिका प्रशासनाला खड्डे बुजविण्यासाठी हप्त्याभराचा कालावधी लागणार आहे.

डोंबिवली शहरात पूर्व, पश्चिम आणि औद्योगिक विभागात रस्त्यांची चाळण झाली असून रसत्यावर चालणे किंवा गाडी हाकणे कठीण झाले आहे. पालिका प्रशासनाने उच्चदर्जाचा रस्ता म्हणून ९० फुटी रस्ताबाबत हवेत पतंगबाजी केली होती. काही काळातच या रस्त्याचीही अवस्था इतर रस्त्यांप्रमाणे खड्डेच-खड्डे अनुभवल्याची माहिती मनसेचा पदाधिकाऱ्यांनी पालिका वर्धापनदिन खड्यात साजरा केला. त्यानंतरही पालिका प्रशासन थांबा आणि वाट पहा भूमिकेला धरून कायम राहिले. प्रशासनाने खड्डेमुक्तीसाठी काळ लागेल असे जाहीरपणे सांगून टाकले. याबाबत मात्र पालिकाच्या काही अधिकाऱ्यांनी पावसाची उघडीप मिळाली तर लागलीच खड्डे बुजवू असेही सांगितच्या चर्चा आहेत.

यापूर्वीही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूकही रस्त्यातील खड्ड्यामुळे तणावात लढल्याची उदाहरणे डोंबिवलीकरांना परिचयाची आहे. आजही नागरिक त्याची आठवण करून द्यायला विसरत नसले तरी प्रशासनाला याबाबत काहीच सोयरसुतक नसल्याने राजकीय पुढारी पुन्हा पुन्हा आंदोलनाचा इशारा देत आहेत. याबाबत भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी रस्त्यातील खड्डे मुक्त झाले नाहीत तर भाजपा उग्र आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत तर मनसेचे नेते राजेश कदम म्हणतात, पालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर नागरिकांना देणार आहोत. आता नागरिकच पालिका अधिकाऱ्यांना रस्त्याविषयी जबाब मागतील तेव्हा जनतेचा आवाज काय असतो ते कळेल.