रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीच्या प्रस्तावास कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्थायी समितीचा हिरवा कंदील

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समितीची बैठक आज सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करीत संपन्न झाली. यामध्ये पावसाळ्यातील रस्त्यांची देखभाल दुरूस्तीच्या प्रस्तावास स्थायी

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समितीची बैठक आज  सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करीत संपन्न झाली.  यामध्ये पावसाळ्यातील रस्त्यांची देखभाल दुरूस्तीच्या प्रस्तावास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला.  स्‍थायी समितीची सभा सभापती विकास म्‍हाञे यांचे अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली.

पावसाळयाच्‍या काळात रस्‍ते सुस्थितीत राहण्‍याच्‍या दृष्टीकोनातून  सभेत अ, ब,क ,ड ,जे, फ, ग , ह, आय , ई या प्रभाग क्षेत्रातील रस्‍त्‍यांच्‍या देखभाल दुरूस्‍तीच्‍या प्रस्‍तावांस मंजुरी देण्‍यात आली. या सभेत डोंबिवली पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या कोपर रेल्‍वे उडाणपूलाचा जुना डेक स्‍लॅब तोडून पुर्नबांधणी करणे व त्‍याला जोडणाऱ्या पोहोच रस्‍त्‍यावरील पुलाच्या बांधकामाचा प्रस्‍ताव स्‍थायी समितीच्‍या माहितीसाठी सादर करण्‍यात आला. हे काम तातडीचे असल्‍यामुळे लॉकडाऊन कालावधीमध्‍ये ३ महिन्‍यांचे काम १५ दिवसात करण्‍यात आले असून पुलाचे काम प्रगती पथावर आहे. राजाजी पथ अंडरपासचे काम देखील करण्‍यात येत आहे, त्‍याचप्रमाणे पुलाचे काम ३-४ महिन्‍यात पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न राहिल, अशी माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्‍ली यांनी स्थायी समिती सभेत दिली.