जातीवादातून हत्या करणाऱ्यांना फाशी द्या-  आर.पी.आयची मागणी

कल्याण : जातीवादातून हत्या झालेल्या अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कल्याणमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी

कल्याण : जातीवादातून हत्या झालेल्या अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कल्याणमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार दिपक आकडे यांना दिले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जातीय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून सामाजिक सूत्र मांडण्यात आले. त्याच पुरोगामी महाराष्ट्रात जातीय विषमतेचा नाग पुन्हा आपला फणा उभारू पाहत आहे. याच विषारी जातीयतेतून अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप आर.पी.आय ने केला असून याचा निषेध कल्याणमध्ये करण्यात आला.

कल्याणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात याबाबत निषेध व्यक्त करत आर.पी.आय.च्या शिष्टमंडळाने तहसीलदार दिपक आकडे यांना निवेदन देत जातीवादातून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात आर.पी.आय. चे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव, युवक जिल्हाध्यक्ष सुमित माने, रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हरी भालेराव, महिला जिल्हाध्यक्षा शालिनी भोंडगे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक लिहितकर, अन्वर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश बर्वे, युवक जिल्हा सरचिटणीस मंगेश वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष संजय निकम, हरी गोस्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते.