चीनी राष्ट्रपतींच्या फोटोला आरपीआयने मारले चपलांचे जोडे

कल्याण : चीन सैन्याने लडाखमध्ये गलवान खोऱ्यात केलेल्या भ्याड हल्यात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने

 कल्याण : चीन सैन्याने लडाखमध्ये गलवान खोऱ्यात केलेल्या भ्याड हल्यात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने आंदोलन करत चीनचे राष्ट्रपती शी. जिनपिंग यांच्या फोटोला चपलांचे जोडे मारण्यात आले. चीनी सैनिकांनी केलेल्या नपुसंक कामाचा आर.पी.आय.चे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांच्या नेत्तृत्त्वाखाली  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. यानंतर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात जात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी. जिनपिंग यांच्या फोटोला चपलांचे जोडे मारले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चीन सैन्याने भारतीय सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला असून, सर्वप्रकारच्या चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन आठवले यांनी भारतीय जनतेला केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी सर्व भारतीयांनी मोबाईल मधील चीनी अॅप्लीकेशन  आणि चीनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. चीन ने आपल्या कुरापती अशाच सुरु ठेवल्या तर भारतीय सैन्य आणि भारतीय जनता चीनला चांगलाच धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया आरपीआयचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी यावेळी दिली.या आंदोलनात आरपीआयच्या कल्याण डोंबिवली महिला अध्यक्षा मीना साळवे, आरपीआय रिक्षा युनियनचे शहर अध्यक्ष विलास गायकवाड, संतोष जाधव, अरुण पाठारे, राहुल कांबळे, प्रतिक सानप, नरेंद्र मोरे, कृष्णा ब्राम्हणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.