rpi protest against hathras incident

कल्याण : उत्तरप्रदेशमधील हाथरस(hathras) येथील मुलीवर ४ नराधमांनी अमानुष अत्याचार करून सामुहिक बलात्कार केला. यामध्ये या मुलीचा मृत्यू झाला असून या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निदर्शने(republicanprty of india protest) करत निषेध नोंदविण्यात आला.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत झालेल्या घटनेचा निषेद नोंदवत घोषणाबाजी करत निदर्शने केली. उत्तर प्रदेश योगी सरकारची दलित विषयी असणारी आस्था हि पोकळ व जातीयवादी आहे. पिडीत मुलगी हि १५ दिवस हॉस्पिटलला मृत्यूशी झुंज देत होती त्यात तिचे निधन झाले. तिचा मृतदेह सुद्धा नातेवाइकाना देण्यात आला नाही. हा प्रकार निंदनीय असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषी नराधमांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी आरपीआय कडून करण्यात आली. याबाबत तहसीलदार कार्यलयात नायब तहसीलदार विठ्ठल दळवी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आरपीआयचे नेते अण्णा रोकडे, आरपीआय कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक भीमराव डोळस, महादेव रायभोळे, माणिक उघडे, बाळा बनकर, डी. व्ही. ओव्हळ, कुमार कांबळे, विकास खैरनार, दिपक ओव्हळ, गणेश कांबळे, एम.एस.भिसे, सुभाष कदम, रमेश बनसोडे, रमेश मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.