चीनच्या भ्याड हल्ल्याचा आरएसपी शिक्षकांकडून निषेध – शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

कल्याण : गलवान येथे चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा आरएसपी शिक्षक अधिकारी कल्याण-डोंबिवली युनिटने तीव्र निषेध व्यक्त करून या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली

 कल्याण : गलवान येथे चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा आरएसपी शिक्षक अधिकारी कल्याण-डोंबिवली युनिटने तीव्र निषेध व्यक्त करून या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या विरोधात आपत्कालीन परिस्थितीत लढून प्राण गमावलेल्या पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही श्रद्धांजली देण्यात आली.

यावेळी बोलताना आरएसपी कमांडर मनीलाल शिंपी यांनी भारतीय सैनिकांच्या गौरवाचा इतिहास सांगत हे बलिदान व्यर्थ जाणार नसून भारतीय सैनिक अशा हल्ल्याना तोंड देण्यास समर्थ आहे. तर आर एस पी अधिकारी अनिल बोरनारे यांनी भारतीय जवानांना श्रद्धांजली देत देशाच्या गौरवशाली इतिहासात गलवानचा भ्याड हल्ला देश कधीही विसरणार नाही. शाहिद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो राष्ट्रप्रेमी तरुण तयार होतील असे सांगून चिनी मालावर बहिकार टाकून स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन देशवासियांना केले.

यावेळी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कल्याण डोंबिवली समादेशक मनिलाल शिंपी, प्रसिद्धी प्रमुख अनिल बोरनारे, प्रशांत भामरे, बापू शिंपी, सचिन मालपुरे, कैलास पाटील,नितीन पाटील,रितेश पाटील,आर आर भोकनल,केशव मालुंजकर, अनंत कीनगे, जितेंद्र सोनवणे, बन्सीलाल महाजन, करण जडेजा, भानुदास शिंदे, तुषार बोरसे, ट्रॅफिक पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, ट्रॅफिक वॉर्डन शुभम मिश्रा या सर्वांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.