पहिल्या लॉकडाऊनपासून मिशन बिगीन अगेनपर्यंत आरएसपी शिक्षकांचा कोरोना योद्धा म्हणून मोलाचा वाटा

कल्याण : लॉकडाऊन- १ ते लॉकडाऊन - ४ तसेच आता मिशन बिगीन अगेनमध्ये सलग ८० दिवसांपासून आरएसपी शिक्षक अधिकारी पोलिसांना मदत करीत असून पोलिसांवरील ताण कमी करीत आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये

कल्याण : लॉकडाऊन- १ ते लॉकडाऊन – ४ तसेच आता मिशन बिगीन अगेनमध्ये सलग ८० दिवसांपासून आरएसपी शिक्षक अधिकारी पोलिसांना मदत करीत असून पोलिसांवरील ताण कमी करीत आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेले मात्र कल्याण परिसरात राहणारे शिक्षक कल्याणमधील शहाड नाका, गांधारी नाका, वालधुनी, व विविध परिसरात पोलीस खात्याला मदत करीत आहेत. यासोबतच सामाजिक दायित्व म्हणून गरजूंना अन्नधान्याचे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वेतन नसलेल्या शिक्षकांना मदतीचे कार्य विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुरू आहे.

लॉकडाऊन सुरू झाले. शाळा बंद झाल्या. सगळे व्यवहार ठप्प झाले. पोलीस, डॉक्टर, नर्स सगळेच कोरोनाला हरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताय यांच्या जोडीला सलग ८० दिवसांपासून शाळा बंद असूनही घरात स्वस्थ न बसता आरएसपी शिक्षक महाराष्ट्र आरएसपी महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या आदेशानुसार, कल्याण डोंबिवली आरएसपी युनिटचे कमांडर मनीलाल शिंपी यांचा नेतृत्वाखाली महादेव क्षीरसागर, अनिल बोरनारे, कैलास पंडित पाटील, रितेश दत्तात्रय पाटील, केशव मालुंजकर, दत्तात्रय भानुदास पाटील, भारती जाधव, जितेंद्र सोनवणे, सचिन मालपुरे, तुषार बोरसे, रामदास रखमाजी भोकनळ, बापू जगन्नाथ शिंपी, दिलीप पावरा, बन्सीलाल महाजन, अनंत किनगे, नितीन नाना पाटील, योगेश अहिरे, राजेंद्र गोसावी, करण सिंग जडेजा कोरोना योद्धा म्हणून कार्य करीत आहेत.

जनता कर्फ्युपासून सुरू झालेली ही सेवा लॉकडाऊन ४ व आता मिशन बिगीन अगेन ३० जूनपर्यंत सलग करण्याचा या शिक्षकांचा मानस आहे. या आरएसपी शिक्षकांच्या कामगिरीवर खुश होऊन कल्याण परिमंडळ ३ चे उपायुक्त विवेक पानसरे यांनी या सर्व शिक्षकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून  नेमणूक केली आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार,  वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील, खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, पी एस आय चव्हाण, जाधव, रामदास शेंडगे, प्रमोद पाटील,  देवीलाल कोळी, सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे, अविनाश पाळदे, सुनील वाघ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.