साकेत महाविद्यालयाने वेब संवादाद्वारे साजरा केला पर्यावरण दिन, पोस्टर बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन

कल्याण : कल्याण पूर्वतील साकेत महाविद्यालय ,राष्ट्रीय सेवा योजना व नेचर क्लब याच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाईन जैवविविधतेचे संवर्धन या विषयावर वेबसंवादाचे व पोस्टर मेकिंग

कल्याण : कल्याण पूर्वतील साकेत महाविद्यालय ,राष्ट्रीय सेवा योजना व नेचर क्लब याच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाईन जैवविविधतेचे संवर्धन या विषयावर वेबसंवादाचे व पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वसुंधरा संजीवनी मंडळाचे सदस्य प्रा. आनंद भागवत यांनी विद्यार्थी व शिक्षकाना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणात जैवविविधतेचे रक्षण करणे गरजेचे आहे. तर  पर्यावरण दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय जोशी यांनी ऑनलाईन माध्यमातून सांगितले की, पृथ्वीवर फार मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. त्या किती महत्वाच्या आहेत, मानवाने त्याचा ऱ्हास कसा केला, त्यामुळे पुढच्या पिढीला पर्यावरणातील प्राणी, पक्षी व वनस्पतीच्या जाती देता येणार नाही.यामुळेच त्याचे रक्षण करणे मानवाची जबाबदारी आहे.                             

कनिष्ठ महाविद्यालय ऑनलाईन पोस्टर मेकिंग स्पर्धेत  २९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात प्रथम क्रमांक वैष्णवी ठाकरे ,द्वितीय क्रमांक अंकुश गिरी ,तृतीय क्रमांक रोशन चौरसिया,यांना देण्यात आला. या ऑनलाईन वेबसंवादात साकेत ज्ञानपीठ संस्थचे सचिव, साकेत कुमार सी.ई. ओ. शोभा नायर, साकेत महाविद्यलयचे  प्राचार्य डॉ.एस. के.राजू ,साकेत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट निर्देशक सनोज कुमार प्रा बिजू प्रसिना, प्रा.राजेश्री मुंढे ,प्रा.ग्रीष्मा नायर,प्रा.पूजा पांडे,प्रा.नमिता बागवे,प्रा. सूविथा एस. आणि इतर उपस्थित होते.