सर्व कामगारांना कंपनीने वेतन द्यावे, केंद्राने कंपन्यांना मदत करावी – जनरल कामगार युनियनचे कामगार मंत्र्यांना निवेदन

वाडा : देशात आणि राज्यात कोरोणच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा काळावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊन कालावधीत कामगारांना पगार हवाय यासाठी तो कंपनीकडे मागणी करताना दिसतोय. या सर्व

वाडा : देशात आणि राज्यात कोरोणच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा काळावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊन  कालावधीत कामगारांना पगार हवाय यासाठी तो कंपनीकडे मागणी करताना दिसतोय. या सर्व कामगारांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन  कायदा २००५ ने लॉकडाऊन काळातील सर्व मजूर कर्मचारी आणि कामगारांना कंपनीने वेतन देण्यात यावे.असे असताना कंपनी वर्गाकडून न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. आज घडीला कंपनीकडून कामगारवर्ग वेतन मिळावे या मागणीचे निवेदन जनरल कामगार युनियन (लालबावटा) चे अध्यक्ष राजेंद्र परांजपे सरचिटणीस बळीराम चौधरी यांनी निवेदनाद्वारे कामगारमंत्री व सहायक आयुक्त यांच्याकडे केली आहे . कंपनीतील कर्मचारी, कामगार, कंत्राटी कामगार असो बांधकाम मजूर अगदी शिकाऊ कामगार(अप्रेंटीस)या सर्वांना लॉकडाऊन काळात कंपनीने वेतन देण्यात यावे. अशी मागणी ही जनरल कामगार युनियन (लालबावटा) यांनी राज्याचे कामगार मंत्री आणि पालघर जिल्ह्यातील बोईसर आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन सादर केली आहे. यात त्यांनी कामगारांना वेतन द्यावे आणि लॉकडाऊन काळात काही कंपनीवर्गाचे उत्पादन बंद आहे. अशा कंपन्यांना लॉकडाऊन काळात कामगारांना वेतन देणे अशक्य आहे. त्यासाठी कंपनी मालक वर्गाला केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन काळात कामगारांना वेतनाअभावी उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. हा कामगार वर्ग आता कंपनीचे दार ठोठावत आहे.