परप्रांतीय मजुरांंची नाव नोंदणी होत असलेल्या ठिकाणी औषध फवारणीची गरज

भिवंडी: भिवंडीत अडकून पडलेल्या लाखो मजूर कामगारांना गावी जाण्यासाठी नाव नोंदणी करणे बंधनकारक झाले असल्याने भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नेमून दिलेल्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मजूर कामगार

 भिवंडी: भिवंडीत अडकून पडलेल्या लाखो मजूर कामगारांना गावी जाण्यासाठी नाव नोंदणी करणे बंधनकारक झाले असल्याने भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नेमून दिलेल्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मजूर कामगार येत असून ते निघून गेल्यावर त्या ठिकाणी औषध फवारणी गरजेची असून ती केली जात नसल्याबद्दल भाजपा शहर सरचिटणीस प्रेषित जयवंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . भिवंडी शहरात शहर पोलीस ठाणे अंतर्गत राहणाऱ्या स्थलांतरीत कामगारांची नावनोंदणी व आरोग्य तपासणी ही कामतघर परिसरातील वव्हाळ देवी मंगल कार्यालय या नागरी वस्तीच्या ठिकाणी केली जात आहे. या ठिकाणी सकाळपासून मोठ्या संख्येने नावनोंदणी व आरोग्य तपासणीसाठी नागरिक येत असतात. त्यामध्ये एखादा कोरोना संक्रमित रुग्ण असल्यास येथील लॉकडाऊन काळात सरकारी आदेशाचे पालन करीत घरी थांबलेल्या नागरीकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो, अशी भीती प्रेषित जयवंत यांनी व्यक्त केली. या ठिकाणी दररोज महानगरपालिका आरोग्य विभागाने औषध फवारणी गरजेची असताना ती करण्याकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रेषित जयवंत यांनी केला आहे .