मुरबाड तालुक्यातील १०० गावांमध्ये चेतनसिंह पवार यांनी केली सॅनिटायझर फवारणी

मुरबाड: मुंबई आणि आसपासच्या उपनगरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे शहरस्थित दहा ते बारा हजार मुरबाडवासियांनी गावाकडे धाव घेतली आहे.या पाहुण्यांकडून गावांना धोका नको म्हणून काँग्रेसचे पर्यावरण

मुरबाड: मुंबई आणि आसपासच्या उपनगरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे शहरस्थित दहा ते बारा हजार मुरबाडवासियांनी गावाकडे धाव घेतली आहे.या पाहुण्यांकडून गावांना धोका नको म्हणून काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी तालुक्यातील शंभर गावांत सॅनिटायझर फवारणी केली आहे.

मुंबई आणि उपनगरांच्या लगत असल्याने मुरबाड तालुक्यातील बरेचसे नागरिक नोकरी आणि कामधंद्याच्या निमित्ताने कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, वाडा, वसई, विरार, उल्हासनगर, ठाणे, मुंबई येथे राहत आहेत. सध्या मुंबई, पालघर, आणि ठाणे जिल्ह्यात सर्वत्र दररोज कोरोना रुग्णांची वाढ होतेय.ठाणे जिल्ह्यात एकमेव मुरबाड तालुक्यात अद्यापपर्यंत एकही रुग्ण नसल्याने आजमितीस मुरबाड हे सर्वात सुरक्षित ठिकाण ठरले आहे.त्यामुळे शहरात राहणाऱ्या मुरबाडच्या मुळ गावकऱ्यांनी आजाराच्या भीतीने आता गावाकडे धाव घेतली आहे. मुरबाड तालुक्यातील गावागावात असे साधारणतः दहा ते बारा हजार मुळ मुरबाडकर पाहुणे दाखल झाले आहेत. या पाहुण्यांकडून जरी कोणता धोका नसला तरी नुकतेच ठाणे येथे राहणारी मुळची मुरबाडची व्यक्ती मानीवली गावात राहून गेली, व नंतर त्यांचा कोरोनात मृत्यू झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ माजली होती.सुदैवाने या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या गावातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीही पाहुण्यांकडून धोका नको या हेतूने चेतनसिंह पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  तालुक्यातील शंभर गावांत सनीटायझर फवारणी करून गावे निर्जंतुकीकरण केली आहेत.