सरळगाव बाजारपेठ ३ दिवस बंद

मुरबाड: सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनसरळगाव बाजारपेठ मंगळवारपासून तीन दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय सरळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. पुढील तीन दिवस फक्त बाजारपेठेतील मेडिकल दुकाने

 मुरबाड: सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरळगाव बाजारपेठ मंगळवारपासून तीन दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय सरळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. पुढील तीन दिवस फक्त बाजारपेठेतील मेडिकल दुकाने सुरू असतील, असे ग्रामपंचायत प्रशासनाने कळवले आहे. सध्या मुरबाड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, मात्र लगतच्याच शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले संशयित सापडले होते.शहापूर तालुक्यात दररोज वाढणारी रुग्णांची संख्या पाहता शहापूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्याने शहापूरच्या किन्हवली आणि शेणवे भागातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आपला मोर्चा मुरबाड तालुक्यातील सरळगाव बाजारपेठेकडे वळवला आहे.शहापूरमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना या गावांतील नागरिकांची कोरोनामुक्त बाजारपेठांमध्ये ये जा सुरू असते, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सरळगाव ग्रामपंचायतीने बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूरच्या वासिंद आणि परिसरातील भागातही रुग्ण सापडले असताना या गावांतील नागरिक बाजारहट करण्यासाठी मुरबाड बाजारपेठेतही दररोज ये जा करत असतात, त्यामुळे मुरबाडला संक्रमणाचा धोका वाढला आहे.