भिवंडीत सारी आजाराचा विळखा – वेगळ्या आरोग्य व्यवस्थेची गरज

भिवंडी: सध्या जग कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त असताना महाराष्ट्रात सारीच्या आजाराने डोके वर काढले आहे कोरोना प्रादुर्भावासमोर सारी आजाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे भिवंडी येथील

 भिवंडी:  सध्या जग कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त असताना महाराष्ट्रात सारीच्या आजाराने डोके वर काढले आहे कोरोना प्रादुर्भावासमोर सारी आजाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती शासकीय कोव्हीड रुग्णालयातील आकड्यांवरून समोर आले आहे . वास्तविक पाहता कोरोना संसर्ग बळावल्या नंतर त्याचा फुफुसावर परिणाम होऊन फुफुस निकामी ठरल्याने ते रुग्ण सारी चे समजले जातात त्यासाठी ठाणे येथे कोरोना रूग्णा साठी जिल्हा रुग्णालय तर सारीच्या रुग्णा साठी कालवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय अशी स्वतंत्र व्यवस्था केली असल्याने संसर्ग बळावण्याची प्रमाण कमी आहे परंतु भिवंडी येथे स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोव्हीड रुग्णालयातच या दोन्ही आजाराचे रुग्ण येत असल्याने त्याचा ताण येथील आरोग्य सेवेवरसुध्दा पडल्याचे जाणवते .

 या रुग्णालयात आतापर्यंत सारी आजाराचे २३१ रुग्ण दाखल झाले त्यापैकी ३१ जणांचा मृत्यू झाला तर १९० कोरोनाबाधित दाखल होऊन त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे साहजिकच कोरोनापेक्षा सारीचे रुग्ण अधिक असून मृतांची संख्या ही अधिक असताना त्यासाठी भिवंडीत वेगळी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात शासन पातळीवर अजूनही कोणतीही उपाययोजना होत नसल्याने येथील परिस्थिती गंभीर बनली आहे एवढे नक्की . तर आयजीएम या रुग्णालयातही २ डॉक्टर्स , ७ परिचारिका ,२ रुग्णवाहिका चालक व ४ कर्मचारी अशा रुग्णालयातील १५ जणांना कोरोना बाधा झाल्याने येथील रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात येथील व्यवस्था कमी पडत असून त्याकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे .