२ साडेसात फुट लांब धामणीसह १ घोरपडीला सर्पमित्राने दिले जीवनदान

कल्याण : कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरात खुराड्यातील कबुतराची तीन पिलांना खाणाऱ्या आणि दोन कबतुरांना मारणाऱ्या दोन साडेसात फुटी धामणींना सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पकडुन जीवनदान दिले आहे. कल्याण पश्चिमेतील कोळवली गाव परिसरातील लोखंडे पाडा येथे राहणारे,

या धामणीनी कबुतरांची ३पिल्ले खाऊन फस्त करीत दोन कबुतरांना मारल्याचे त्या प्रसंगी निर्दशानास आले. साडेसात फुट लांबीच्या दोन धामणींना पकडल्याने उपस्थितीतांनी सुटकेचा निश्वास टाकला. पकडलेल्या दोन्ही धामणीना सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी वनपाल एम् डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आधिवासात सुखरूप सोडत जीवनदान दिले.                           

तसेच सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी शनिवारी संध्याकाळी  बी कॅबीन परिसरातील बंगल्याच्या बाहेरील कंम्पाऊन्ड मधुन साडेचार फुटी लांब व तीन किलो वजनाची घोरपड पकडुन तिला जीवनदान दिले. घोरपड पकडणे, मारणे यांस वन्य जीवन कायद्यानुसार बंदी असुन नैसर्गिक साखळीत घोरपड ही कीटक, किडे, सापाची पिले, अंडी खाते नैसर्गिक सहजीवनाचा भाग असलेल्या घोरपडी ह्या औषधी असलेल्या समजुतीमुळे पकडल्या जातात. 

घोरपडी च्या शेपटीचा फटका हातावर बसल्यास हात  निकामी होतो असा गैरसमज असुन घोरपड आपला बचाव शेपटीच्या फटकर्याने करते, साधरण चाबुकांच्या फटक्यासारखी त्यांची तीव्रता असते अशी माहिती यानिमित्ताने सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगत पकडलेल्या घोरपडीला जीवनदान देत घोरपडीस नैसर्गिक आधिवासात सोडले असल्याचे सांगितले.