Manusakh Hiren Suicide? Manusakh Hiren's last mobile location found; Shocking twist in the case

एटीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हत्येचा सीन रिक्रियेट करताना एटीएस टीम, वरिष्ठ अधिकारी, फॉरेन्सिक तज्ञ उपस्थित होती. सीन रीक्रियेट करण्यासाठी आवश्यक असलेले स्थानिक मच्छीमार यांचीही मदत घेतली. घटनेच्या दिवशी ५ मार्च अगदी पहाटे खाडीच्या वातावरणाचा अंदाज मच्छीमारांकडून घेऊन तांत्रिकदृष्ट्या हा हत्येचा सीन रिक्रियेट करण्यात आला. एटीएस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने खाडीच्या भरती आणि आहोटी, वातावरण आणि हवामानाची स्थिती घटनेच्या दिवशी के आणि कशी होती याचा अंदाज घेऊनच १० मार्च, आणि ११ मार्च रोजी रात्री हवामान खात्याच्या अंदाजानुसार मनसुख हिरेन याच्या हत्येचा सीन रीक्रियेट करण्यात आला. यावेळी एटीएस वरिष्ठ अधिकारी आणि टीम यांच्यासह एटीएस मुख्य अधिकारी जैजीत सिंह हे देखील ११ मार्चला संध्याकाळी आपल्या टीम सोबत मुंब्रा खाडी रेतीबंदर येथे उपस्थित होते.

    ठाणे :  ५ मार्च २०२१ रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात अनेक विसंगती आढळल्याने मनसुख हिरेनची हत्या कशी झाली याबाबत वास्तविक माहिती समोर येत नव्हती. अखेर एटीएसने १० मार्चच्या मध्यरात्रीनंतर आणि ११ मार्चच्या रात्रीत मनसुख हिरेन हत्येचा सीन रिक्रियेट केला असल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.

    एटीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हत्येचा सीन रिक्रियेट करताना एटीएस टीम, वरिष्ठ अधिकारी, फॉरेन्सिक तज्ञ उपस्थित होती. सीन रीक्रियेट करण्यासाठी आवश्यक असलेले स्थानिक मच्छीमार यांचीही मदत घेतली. घटनेच्या दिवशी ५ मार्च अगदी पहाटे खाडीच्या वातावरणाचा अंदाज मच्छीमारांकडून घेऊन तांत्रिकदृष्ट्या हा हत्येचा सीन रिक्रियेट करण्यात आला. एटीएस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने खाडीच्या भरती आणि आहोटी, वातावरण आणि हवामानाची स्थिती घटनेच्या दिवशी के आणि कशी होती याचा अंदाज घेऊनच १० मार्च, आणि ११ मार्च रोजी रात्री हवामान खात्याच्या अंदाजानुसार मनसुख हिरेन याच्या हत्येचा सीन रीक्रियेट करण्यात आला. यावेळी एटीएस वरिष्ठ अधिकारी आणि टीम यांच्यासह एटीएस मुख्य अधिकारी जैजीत सिंह हे देखील ११ मार्चला संध्याकाळी आपल्या टीम सोबत मुंब्रा खाडी रेतीबंदर येथे उपस्थित होते.

    कसा केला हत्येचा सीन रिक्रिएट?

    सर्वप्रथम हत्या प्रकरणात हत्येचा सीन रिक्रिएट करताना एटीएस पोलिसांनी हवामान खात्याचा अभ्यास केला. मृत्यूच्या हत्येबाबत मुंब्रा खाडीचे हवामान, भरती आणि आहोटी प्रमाण, हायटाईड आदींचा अंदाज घेऊन तसाच हवामानाच्या आणि हायटाईड च्या वातावरणात १० मार्च रोजी मध्यरात्रीनंतर आणि ११ मार्चच्या अगदी पहाटेच्या सुमारास वातावरण आणि इतर तत्सम वातावरण मिळते-जुळते असल्याने याच दिवशी हत्येचा सीन रिक्रीएट करण्याचा निर्णय घेऊन तो यशस्वी पणे करण्यात आला. मात्र या रिक्रीएट मध्ये एटीएस पथकाच्या हाताला काय लागले? हे मात्र समजू शकले नाही. एटीएस पथकाने मनसुख याच्या वजनाचा आणि आकारमानाचा एक पुतळा बनवून हा सीन रिक्रीएट करण्यात आला. तर एटीएस पथकाने मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या रुग्णवाहिकेतून नेला. त्या रुग्णवाहिका चालक अब्दुल्ला याचीही चौकशी केली. चौकशीत मृतदेहाच्या तोंडावर नवे रुमाल सापडले याबाबतही चौकशी केल्याची माहिती आहे.