thane municipal corporation

ठाण्यात कोरोनाचे रुग्ण कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहेत. सद्या तरी ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी मात्र कोरोना अजून गेला नाही. येणाऱ्या सणासुदीला बाजारात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नसून उगचाच नागरिकांनी गर्दी करू नये. आवाहन ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.

ठाणे : ठाण्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट चांगला असून दिलासादायक स्थिती पाहायला मिळत आहे. येत्या हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने ठाण्यातील कोणतेही कोविड रुग्णालय अद्याप बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही अशी ठोस माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच रुग्णालय बंद करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाणार असून नागरिकांनी रुग्णालय बंद होण्याच्या अफवा उगचाच पसरवू नयेत असे आवाहन शर्मा यांनी केले.

ठाण्यात कोरोनाचे रुग्ण कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहेत. सद्या तरी ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी मात्र कोरोना अजून गेला नाही. येणाऱ्या सणासुदीला बाजारात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नसून उगचाच नागरिकांनी गर्दी करू नये. आवाहन ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.दरम्यान या काळात कोणीही गाफील राहू नये. बाजारपेठ मध्ये गर्दी होणार नाही,शोसल डिस्टन्सचे पालन केले पाहिजे तसेच नागरिकांनी सिनिटायझर चा वापर करावा, राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे देखील आवाहन यावेळी शर्मा यांनी केले.

कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याने खर्च वाचवण्यासाठी हे रुग्णालय बंद करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती, अचानक या निर्णयामुळे नागरिकांच्या मनात खळबळ उडाली होती. कळाव्यात तर नागरिकांनी चिंता देखील व्यक्त केली होती. मात्र जोपर्यंत कोरोना पूर्णपणे जात नाही तोपर्यंत ठाण्यातील कोणतेही कोरोना हॉस्पिटल व क्वारंटाईन सेंटर बंद करण्यात येणार नसल्याचे आयुक्त शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.